“आमचा सण,आमची जबाबदारी” च एक उत्तम उदाहरण; श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्याकडून नदीकाठावरील मूर्तींचे पुन: विसर्जन.

निपाणी प्रतिनिधी :
श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ निपाणी यांच्या वतीने यमगर्नी येथील वेद गंगानदी मध्ये निपाणी आणी निपाणी परिसरातील भक्तांनी मंगळवारी ज्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले होते, त्यातील कित्येक गणेश मूर्ती या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बाहेर पडल्या, याची माहिती श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प. पू प्राणलिंग स्वामीजी यांना कळताच तातडीने प. पू स्वामीजी यांनी मठाचे कार्यकर्ते यांच्या सोबत चर्चा करून लागलीच दुसऱ्या दिवशी दिनांका 19 सप्टेंबर वार रविवारी सकाळी 7वाजता स्वता प. पू. प्राणलिंग स्वामीजी आणी श्री गणेश भक्त यांनी या सर्व मूर्तीचे विटंबना होवू नये म्हणून पाण्याबाहेरील सर्व गणेश मूर्ती परत नदीच्या मध्यभागी विसर्जन केल्या.
यावेळी प. पू प्राणलिंग स्वामीजी यांच्या हास्ते सामोहीक आरती व पूजा करून यमगर्नी व सोँदलगा नदीच्या काटावर सुमारे 400 हून अधिक श्रीगणेश मूर्तीचे वेदगंगा नदी च्या वाहत्या पाण्या च्या मध्यभागी विसर्जन करण्यात आले. यावेळी प. पू स्वामीजी यांनी ज्या प्रकारे आपण 5 दिवस गणपती ची भक्ती भावाने पूजन करतो आणी त्याच भक्ती भावाने विसर्जन करतो पण विसर्जना नतंर आपली जबाबदारी संपत नाही, तर ती योग्य पध्दती ने विसर्जन झाले आहे का? हे हि पहाणे आपली जबाबदारी आहे, तसच गणेश मूर्ती ची उंची हि धर्मशास्त्र नुसार असावी, खुप मोठी नसावी व गणेश मूर्ती शाडुच्या मातीचीच असावी कारणं प्लास्टर ऑफ परीस ची श्री ची मूर्तीचे विसर्जन हि होत नाही, आणी पर्यावरणाला हि घातक असते, त्यामुळे भक्ती सोबत पर्यावरणाचा हि समतोल राखणे हि आपली जबाबदारी आहे. नदी शेजारच्या गांवा मधील सर्व तरूण मंडळ आणि गावातील तरुणांनी पुढाकार घेवून वेदगंगा नदी शेजाऱ्यांच्या गावातील सर्वांनी ज्या गणेश मूर्ती पाण्या बाहेर आहेत त्याचे विटंबना होवू नये म्हणून सर्वांनी एकत्र येवून त्या तत्परतेने सोडाव्यात. पुढच्या वर्षी अशा पध्दतीचे विसर्जन होवू नये म्हणून व्यवस्था करावी, असे आव्हान श्री. विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्रणालिंग स्वामीजी यांनी केले.