ताज्या बातम्यामहाराष्ट्र

…अन्यथा राज्यपालांचं धोतर फेडू : मराठा समाजाचे नेते विनोद पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात छत्रपतींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांना वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. मराठा समाजाचे नेते आणि आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यपालांना धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलंय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. आता महाराजांच्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आलेत. ‘समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?’ असं वक्तव्य त्यांनी केलंय.

काल राज्याचे राज्यपाल यांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे आम्हाला वाटते असे विनोद पाटील म्हणाले .

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी आवाहन करतो की तात्काळ या बदफैली राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही असेही त्यांनी सांगितले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks