ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेंद्रिय शेती काळाची गरज : कृषी मित्र शरद देवेकर यांचे मनोगत.

गारगोटी प्रतिनिधी :

भुदरगड तालुका महसूल पंधरवडा अंतर्गत तालुका कृषी विभागामार्फत कृषी प्रक्रिया उद्योग व सेंद्रिय शेती या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम शाहू वाचनलयामध्ये उत्साहात पार पडला.

यावेळी महाराष्ट्र शासन शेतीमित्र श्री शरद देवेकर यांनी मानवी जीवनात सेंद्रिय शेती का गरजेची आहे त्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले . यामध्ये त्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व, सेंद्रिय शेती का करायला हवी आणि सेंद्रिय शेतीसाठी लागणारे घटक उदाहरणार्थ कंपोस्ट खते ,सेंद्रिय खते, सेंद्रिय शेतीची तत्त्वे, जीवामृत , घनामृत , बिजामृत, पंचगव्य, पंचगोकृपामृत तसेच कंपोस्ट खते बनवण्याची नॅडेप पद्धत का गरजेची आहे याबद्दल मार्गदर्शन केले.

कृषी प्रक्रिया उद्योग यावर बोलताना श्री अशोक मोरे यांनी विविध प्रक्रिया उद्योग कसे निर्माण करायला हवेत व त्याचे महत्त्व सांगितले. अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतात त्यावर देखील त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रस्तावित व पाहुण्यांचे स्वागत तालुका कृषी अधिकारी श्री किरण पाटील यांनी केले.

या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी श्री. नितीन भांडवले श्री सुनील डवरी सर्व कृषी सहाय्यक, कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री राम भाट सर, महसूल विभागाचे पी.जी मोरे साहेब ,भुदरगड तालुका आत्मा कमिटी ,शंभूराज वारके ,कृषी तंत्र निकेतनचे शिक्षक आणि विद्यार्थी व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमलताई तुळजाई यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks