ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये शिवराजचे उज्वल यश

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

येथील शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगूडच्या बॉक्सिंग खेळाडूनी कोल्हापूर जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत उज्वल यश संपादन करत तीन वजन गटांमध्ये सुवर्णपदकावर आपला शिक्कामोर्तब केला . तर दोन वजन गटामध्ये रौप्य पदकावर आणि एका वजन गटामध्ये कास्यपदकावर शिक्कामोर्तब करीत बॉक्सिंग जिल्हा चॅम्पियनशिप स्पर्धेवर आपल्या विद्यालयाचे वर्चस्व प्रस्तापित केले .

विजेते खेळाडू पुढील प्रमाणे : आयान अमीर मुजावर ३८ किलो वजन गट सुवर्णपदक, ताहीर भोला शिकलगार ४२ किलो वजन गट सुवर्णपदक , सोहम सचिन जाधव ३६ किलो वजन गट सुवर्णपदक, राजवीर कृष्णात जाधव ४० किलो वजनगट रौप्यपदक , शर्वरी राजेंद्र भारमल ३४ किलो वजन गट रौप्यपदक , श्रेया सदानंद गोंधळी ४० किलो वजनगट कास्यपदक विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक ई .व्ही .आरडे, ओमकार सुतार यांचे मार्गदर्शन लाभले . तर खासदार संजयदादा मंडलिक, अॅ ड विरेंद्र मंडलिक , कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य पी डी माने , उपप्राचार्य आर बी शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks