विशेष लेख : अवचितवाडी चे रामलिंग

शब्दांकन : व्ही.आर.भोसले
आजरा शहराजवळ हिरण्यकेशी नदीकाठी रामलिंग आहे .रामाच्या वनवासातील वास्तव्याने पावन झालेली ठिकाणे रामलिंग या नांवाने ओळखली जातात .
असे एक रामलिंग मुरगुड शहराच्या दक्षिणेस अवचितवाडी जवळ आहे .
तेथेच डोंगर उतारावर चिमकाई देवीचे मंदिर व शिवमंदिर आहे .
एक प्राचीन मठ देखील आहे .
चिमकाई देवी म्हणजे पार्वतीचे रूप होय .तिचे हे स्थान जागृत मानले जाते .
श्रीराम हे शिवभक्त होते .वनवासात असतांना ते नित्य शिवपार्वतीच्या मातीच्या ,वाळूच्या किंवा दगडाच्या मूर्ती तयार करून त्यांचे पूजन करायचे.
मंदिरात राम व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत ,सीता कोठे दिसत नाही ,असे शिंत्रे यांना विचारले तेंव्हा त्यांनी पौराणीक संदर्भ सांगितला .
नाशिक जवळ पंचवटीस सिताहरण झाले व रावण आकाशमार्गे सह्यगिरी पार करून केरळ मध्ये गेला .तेथे त्याचे जटायूशी युद्ध झाले .जटायू ज्या ठिकाणी धारातिर्थी पडला त्याच ठिकाणी अलीकडेच विशाल ‘जटायू प्रतिमा ‘स्थापित करण्यात आली आहे .वृत्तपत्रे ,दूरदर्शन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वृत्त प्रसिद्ध झाले।आहे ,.
तेथून रावण सद्याच्या रामेश्वर मार्गे लंकेला गेला व तेथे सीतामातेला अशोकवनात ठेवले .”
त्यामुळे सीतेच्या शोधार्थ ते दक्षिणेकडे मार्गाक्रमण करत होते .त्यावेळी त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते .
चौथऱ्यावर सुंदर संगमरवरी रेखीव मूर्ती तर आहेतच शिवाय पूर्वीच्या त्यांच्या जीर्ण झालेल्या दगडी मूर्तीही दोन्ही बाजूस स्थापित केल्या आहेत .
अशाच जीर्ण झालेल्या कांही मूर्ती वटवृक्षाच्या बुंध्याजवळ सापडल्या .कांही घडीव दगडही मिळाले आहेत .
या रामलिंग मधील राम मंदिराचे प्रवर्तक विष्णू शिंत्रे हे महाराष्ट्र राज्य पाटबंधारे खात्यात अधिकारी होते .ते आता निवृत्त झाले असून रामलिंग च्या आसपासच्या सर्व शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी या क्षेत्राचा विकास सुरू केला आहे .
त्यांनी तेथील जागृत देवस्थांनचीही माहिती दिली .
” वाढलेल्या विस्तृत वटवृक्षाच्या फांद्या तोडायला गेलेल्या लोकांना काळ्या नागाने दर्शन दिले .फांद्या तोडण्यापासून रोखले .असे दोन तीन वेळा घडले .त्यामुळे घबराट निर्माण झाली व आता कोणीही तेथे फांद्या तोडायला जात नाही .”
कुतूहल वाढले व तेथील भाविकांना विचारले तर ते म्हणाले की हे खरे आहे .
” मग मंदिर कसे बांधले ,?”
“चिमकाई देवीला कौल लावला व तो अनुकूल मिळाल्यानंतरच मंदिर बांधले .”
” निधी आणि खर्च ?”
अवचितवाडी तलावाच्या पाझरा खाली हे ठिकाण असलेने आसपासची शेकडो एकर जमीन ओलिताखाली आली आहे ,.पूर्वी गवताचे भारे विकून आम्ही पोट भरत होतो ,आता ऊस पिकवतोय . राम कृपेने सर्वांना चांगले दिवस आले आहेत ,म्हणून आम्ही वर्गणी काढून निधी जमवला व मंदिर बांधले .शिंत्रे साहेब यांचे योगदान मोठे आहे ,.”
मुरगुड जवळील अवचितवाडी चे हे’रामलिंग ‘वेगाने विकसित होत आहे .रामनवमीच्या रंगारंग उत्सवाने भाविकांच्या पर्यंत याची माहिती पोचली आहे .
भाविकांना हे तिर्थक्षेत्र आकर्षित करत आहे.
शब्दांकन : व्ही.आर.भोसले