मुरगूडच्या श्री. व्यापारी पतसंस्थेतर्फै “किया सोनेट ” फोरव्हिलर गाडीचे वितरण

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फै संस्थेचे सभासद डॉ .दादासो मारूती घाटगे रा . गंगापूर यानां किया सोनेट या फोर व्हिलर गाडीचे वितरण करण्यात आले .
श्री .व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन किरण गवाणकर यांच्या शुभहस्ते गाडीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले .व गाडीची चावी सभासद डॉ . दादासो घाटगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली .
या गाडीच्या वितरण प्रसंगी संस्थेचे व्हा . चेअरमन प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री किशोर पोतदार , साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर, प्रशांत शहा , धोंडीराम मकानदार , नामदेवराव पाटील , निवासराव कदम , प्रदिप वेसणेकर , संदिप कांबळे , संचालिका रोहिणी तांबट , सुनंदा जाधव ,कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर , संस्थेचे कर्मचारी , सभासद उपास्थित होते .