ताज्या बातम्यामहाराष्ट्र

तृतीयपंथीय व्यक्तीच्या मतदार नोंदणीसाठी एक दिवसीय विशेष अभियान : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रम 2021 दि. 1 ते 30 नोव्हेंबर अखेर जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथी घटक मतदानापासून वंचित राहू नयेत. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदार कार्यालयामध्ये दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी तृतीयपंथी मतदार नोंदणी करण्यासाठी एक दिवसीय विशेष अभियान आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कळविले आहे.

अभियानामध्ये प्रत्येक तालुकास्तरावर तृतीयपंथी व्यक्तींची नवमतदार नोंदणी, मतदार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

नव मतदार नोंदणीसाठी – वयाचा पुरावा (ग्रामपंचायतने दिलेला अथवा नगरपालिकेने दिलेला जन्माचा दाखला/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र), रहिवासी पुरावा (आधार कार्ड, रेशन कार्ड, चालू लाईट बील, बँकेचे/पोस्टाचे चालू खाते, पासबुक, ड्राईव्हींग लायसन, पॅनकार्ड, पासपोर्ट, गॅस कनेक्शन देयक, भारतीय टपाल विभागाद्वारे अर्जदाराच्या पत्यावर प्राप्त टपालपत्र).
मतदार नाव वगळण्यासाठी- मतदार यादीतील माहिती, स्थलांतराचा/ मयताचा पुरावा/ मृत्यू प्रमाणपत्र.

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी- ज्या तपशिलामध्ये बदल आवश्यक आहे त्याबाबतचा पुरावा. इत्यादीपैकी कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्यास गुरुंचे प्रतिज्ञापत्र व स्वयंघोषणा पत्र सादर करावे.
आवश्यक कागदपत्रे घेऊन दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी संबंधित तालुक्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी स्वत: उपस्थित राहून अभियानाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks