महसूल पंधरवडा निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामानिमित्त लागणाऱ्या दाखल्यांची पूर्तता करून घ्या : तलाठी महादेव देसाई; कडगाव हायस्कूल, कडगाव येथे शिबिर संपन्न
कडगाव प्रतिनिधी :महसूल पंधरवडा निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामानिमित्त लागणाऱ्या दाखल्यांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन कोंडोशी सज्जाचे तलाठी महादेव देसाई यांनी केले.
महसूल पंधरवडा निमित्त कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव या ठिकाणी आयोजित शिबिरामध्ये ते बोलत होते.विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचे दाखले, एस इ बी सी दाखले, ई डब्ल्यू एस दाखले, आधार कार्ड या सर्वांची पूर्तता करून घ्यावी.
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळेमध्येच हे दाखले देण्याची व्यवस्था आपले सरकार केंद्र कडगाव व महसूल सज्जा कडगाव यांनी व्यवस्था केलेली आहे .आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले यावेळी कडगाव सध्याचे सर्कल आर,के ,तोले साहेब, कडगावचे तलाठी समीर जाधव. म्हासरंग चे तलाठी विजय पाटील. पाटगाव चे तलाठी सचिन मर्दाने, बी एल ओ अमृत शिंदे. विशाल ढेकळे. आपले सरकार कडगाव केंद्राचे प्रमुख श्री. मारुती पाटील कडगाव स्कूलचे अध्यापक सी. एस . मासाळ. भडगावकर ए. एम . कला शिक्षक सी .एस .लिमकर. एस .एस .चोरगे. वजीर मकानदार. भैरवनाथ राणे व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक ए.डी .देसाई यांनी केले. मुख्याध्यापक डॉ. आर. डी. पोवार यांनी सर्वांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन चंद्रकांत मासाळ यांनी केले. आभार राजेंद्र चव्हाण यांनी मानले.