आषाढीवारी निमित्य सडोली खालसा येथे व्यसन मुक्ती दिंडीचे केले आयोजन

सावरवाडी प्रतिनिधी :
आषाढी वारीचे औचित्य साधून करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावात संत गोरा कुंभार तरुण मंडळ व सुपर आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल डिस्टन्सचे नियम पाळून व्यसनमुक्ती प्रबोधन दिंडी आज मंगळवारी काढण्यात आली .
कार्यक्रमाच्या ग्रामपंचायत सदस्य जयसिंग कुंभार यांच्या हस्ते मास्क चे वाटप करण्यात आले.मास्क, स्यानिटायझर व सुरक्षित अंतर हे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यापक श्रीकांत चव्हाण यांनी उपस्थितांना आजीवन व्यसनमुक्त जीवनाची शपथ दिली. यावेळी सुपर आर्मीच्या सर्व मुलांनी तंबाखू विरोधी संदेश देणारी प्रबोधनात्मक चित्रे हातात घेतली होती.सर्वजण परंपरागत पोशाखात उपस्थित होते.अध्यापक कृष्णात कुंभार यांनी कोरोनाच्या पासून बचावासाठी करावयाच्या उपाय योजना विशद केल्या.
कार्यक्रमाचे संयोजक महात्मा गांधी व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक श्री एकनाथ कुंभार यांनी तंबाखू विरोधी घोषणा देऊन उपस्थितांना सहभागी करून घेतले.
यावेळी मुख्याद्यापक सुरेश कांबळे,सिद्देश कुंभार,जयराम धनवडे, अमोल खाडे, आनंदा पाटील, कृष्णात मगदूम, धनाजी दिंडे,संजय पाटील,शिवाजी बेलेकर यांनी विशेष प्रयत्न केले.