ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी

गडहिंग्लज प्रतिनिधी : राजेंद्र यादव

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निम्मित सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रक्रियेला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली पाहिजे या विचाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले पाहिजे.यासाठी ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे, पुणे यांचे “आपले भविष्य भारतीय संविधान” हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला व शिक्षकांना हे भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.स्तुत्य असा हा उपक्रम लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला.

गडहिंग्लज शहरातील डॉ झाकिर हुसैन उर्दू विद्यालय ,काळू मास्तर विद्यालय ,सावित्रीबाई फुले विद्यालय ,बँरिस्टर नाथ पै विद्यालय ,दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालय ,छत्रपति शिवाजी विद्यालय इत्यादी असणाऱ्या शाळांना संविधानाची प्रत्येकी पाच प्रति वाटप करण्यात आल्या.

यावेळी लकी खिदमत फाउंडेशन अध्यक्ष अमजत मिर ,इम्रान चाँद , इकबाल नंनदीकर,समीर राऊत , इरफान मुजावर, संविधान चळवळीचे संग्राम सावंत,संतोष कांबळे,दिंगबर विटेकरी, प्रकाश कांबळे,जमीर नदाफ, इरफान शेख,यासीन शेख,अफताब नदाफ , शिलेदार,मलिकजान नदाफ, तौहिद हेब्बाळे,अमजद नदाफ, तबारक अन्सारी व सर्व शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks