श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले आशीर्वाद ; कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जुना राजवाडा निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आशीर्वाद घेतले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जुना राजवाडा या निवासस्थानी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ही सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य खात्याची जबाबदारी मिळाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, “विशेष सहाय्य खात्याच्या माध्यमातून तुम्ही गोरगरिबांची सेवा केलेलीच आहे. तुमच्या हातून सदैव गोरगरिबांची जास्तीत- जास्त सेवा घडो.
यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भय्या माने, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास आदी प्रमुख उपस्थित होते.