राधानगरी तालुका महसुल खाते यांचे वतीने कौलव येथ जातिचे दाखले देण्याचा कार्यक्रम संपन्न.

कौलव प्रतिनिधी :
राधानगरी तालुका महसूल खात्यामार्फत आवळी बुद्रुक मंडळ गटातील गावांमधील अनुसूचित जाती जमाती व इतर संवर्गातील विद्यार्थी-पालकाना जातिचे दाखले देण्याचा कार्यक्रम कौलव येथे संपन्न झाला. जातीच्या दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केल्यावर संबंधीत लाभार्थीना जातिचा दाखला देण्याची सोयीस्कर प्रक्रिया केली जाते. विना खर्च, विना हेलपाटा अशी ही पद्धती होती.
महसूल खात्याचे आवळी बुद्रुक चे मंडल अधिकारी प्रविण पाटील सो,नायब तहसिलदार रानमाळेसो,कौलवच्या सरपंच सविता चरापले,पो.पाटील डी. एस. कांबळे,प्राचार्य अशोक पाटोळे सर,कौलव तलाठी अशोक पाटील साहेब,यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रा.पाटोळे सरांनी सर्वांचे स्वागत करीत प्रास्ताविक केले.
शासन आपल्यादारी असा हा उपक्रम असून जनतेने याचाफायदा घ्यायला पाहिजे.तसेच इतर प्रांतातून महाराष्ट्रात स्थाईक झालेल्या व या राज्यात त्यांच्या दोन तीन पिढ्या गेलेल्या भटक्या समाजाला जातीचे दाखले सहानुभूती पूर्वक द्यावेत म्हणजे या डोंबारी, नंदीबैलवाले,गोसावी,धनगर यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळे येणार नाहीत अशी विनंती अधिकारी वर्गाला पाटोळे सर यांनी केली. मंडल अधिकारी प्रविण पाटील यांनी या मागणीचा निश्चित विचार होईल असे सांगत राधानगरी तालुक्यात पांच शिबिराचे आयोजन असून प्रत्येक शिबिरात १५० ते २०० जातिचे दाखले दिले जातील असे आपल्या मार्गदर्शनात सांगीतले.
यावेळी सुमारे ६७ लाभार्थींचे प्रस्ताव जातीच्या दाखल्यासाठी सादर केले गेले.या कार्यक्रमास कौलव ग्रामविकास अधिकारी, आरडे ,अरूण हणवते,पी.आर.फर्नाडिस, एम.बी.कुरणे,सौ.एन. पी. शिंदे ,अशोक पाटील हे तलाठी,तर आनंदा गुरव व आवळी सज्जातील सर्व कोतवाल,आमजाई व्हरवडे,कौलव, शिरगाव महाईसेवा प्रतिनिधी हजर होते.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आनंदा गुरव, सागर पाटील, राजू पाटील, बंडोपंत येवतकर यांनी मेहनत घेतली. तलाठी अशोक पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.