ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनाळीत श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिराची वास्तुशांती उत्साहात ; मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सोनाळी ता. कागल येथील श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या निधीतून या मंदिरासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. पुन्हा नव्याने दहा लाख रुपये निधी या मंदिरासाठी देणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच; ग्रामदैवत श्री. नागनाथ मंदिरासाठीही मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या माध्यमातून 15 लाख निधी मिळाला आहे. या मंदिरासाठीही निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सोनाळी विद्यामंदिर या प्राथमिक शाळेच्या आवारात प्रार्थना हॉलसाठी दहा लाख रुपये मंजूर निधीच्या कामाचे भूमिपूजनही झाली. श्री. डी. एम. चौगुले यांच्या हस्ते मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार झाला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य व बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयदीप पवार, डी. एम. चौगुले, माजी सरपंच अशोकराव चौगुले, नामदेवराव भोसले, शिवाजी चौगुले, अनिल पाटील, शामराव पोकलेकर, बाळासाहेब पाटील, सागर चौगुले, रामचंद्र शेणवी आदी प्रमुख मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks