बेताल नारायण राणेला कोल्हापुरी पायतानचा प्रसाद देऊ : शिवसेना जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव

शिरोळ प्रतिनिधी : विनायक कदम
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख मा.ना.उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे या कोंबडीचोराने आक्षेपार्ह व बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना हुपरी शहर यांच्यावतीने नारायण राणे याचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख तथा गोकुळचे संचालक मा.मुरलीधर जाधव यांनी हुपरी पोलीस ठाणे येथे नारायण राणे याच्याविरोधात लेखी तक्रार देऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.
महाराष्ट्राचे प्रथम नागरिक तथा आमचे कुटुंबप्रमुख मा.ना.उद्धवजी ठाकरे हे अवघ्या महाराष्ट्राला तळहाताच्या फोडाप्रमाणे कितीही संकटे आली तरी जपत आहेत. तसेच राज्याला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेण्यासाठी मुख्यमंत्री अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळेच ते जनमानसांत अधिक लोकप्रिय होत असल्याचा पोटशूळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालाय आणि त्यातून त्यांनी हे आक्षेपार्ह आणि बेताल विधान केलं आहे. लेखी तक्रारीद्वारे हुपरी पोलीस ठाणे येथे नारायण राणे यांच्यावर गुन्हा नोंद करून तत्काळ अटक करण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. समाजविघातक व बेताल वक्तव्ये करून महाराष्ट्रातील नागरिकांच्या व शिवसैनिकांच्या भावना नारायण राणे यांनी दुखावल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा बेताल नारायण राणेला कोल्हापुरी पायतानचा प्रसाद देऊ, असा सज्जड दम शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख तथा गोकुळचे संचालक मा.मुरलीधर जाधव यांनी दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान,शहरप्रमुख अमोल देशपांडे,महिला आघाडी तालुका संघटिका सौ.उषा चौगुले,विभागप्रमुख राजू सुर्यवंशी,राजू मुधाळकर,माजी विभागप्रमुख राजेंद्र पाटील,संजय वाईंगडे,नगरसेवक बाळासाहेब मुधाळे,पट्टणकोडोली शहरप्रमुख आण्णा जाधव,रेंदाळ शहरप्रमुख महिपती पाटील,युवासेना उपतालुकाधिकारी संताजी देसाई,युवासेना शहराधिकरी भरत देसाई,सौ.मीना जाधव,सौ.सुरेखा पांडव,महेश कोरवी,भरत मेथे,अरुण गायकवाड,संदीप भंडारे,केशव पाटील,अकबर फरास,रणजीत वाईंगडे,संजय चौगुले,तानाजी पांडव,रोहन माळी यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.!