कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी यशवंतराव पाटील तर सचिवपदी बाळासाहेब सुर्यवंशी यांची फेरनिवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन च्या २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवड हुपरी ता- हातकणंगले येथील हुतात्मा स्मारक इमारतीमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोध करण्यात आली.
अध्यक्षपदी यशवंतराव संताजी पाटील (हुपरी ) तर
सचिवपदी बाळासाहेब सुर्यवंशी (अर्जुननगर , कागल ) यांची फेरनिवड झाली .
कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन च्या २०२२ ते २०२७ या कालावधीसाठीचे कार्यकारी मंडळ असे : अध्यक्ष – यशवंतराव संताजी पाटील (हुपरी ) , उपाध्यक्ष – बी. डी. सावगावे (कुरुंदवाड ) , उपाध्यक्ष – महादेव कानकेकर (मुरगुड ) , सचिव – बाळासाहेब सूर्यवंशी (अर्जुननगर – कागल )सहसचिव – सुनील चव्हाण (कुरुंदवाड ) , खजिनदार – नानासाहेब गाट (हुपरी )
सदस्य – शिवाजीराव चोरगे ( गारगोटी ) ,अरविंद भोसले(पन्हाळा), नितीन दिंडे (कागल ) , मारुती काशीद ( पन्हाळा ) पराग जोशी (पन्हाळा ) ,महेश शेडबाळे (कागल ) ,रोहित नांद्रेकर (जयसिंगपूर ) ,
महादेव खराडे ( मुरगूड ) ,सुनील कल्याणी
(हुपरी ) , बाळसिंग मिसाळ ( कोल्हापूर ) व
सुभाष कागले (हुपरी ) या निवडीवेळी विलास कालेकर , भालचंद्र आजरेकर , आनंदराव कल्याणकर , संग्राम तोडकर ,पप्पू आडनाईक , प्रवीण मोरबाळे , संभाजी मांगले , संजय पाटील , वैभव आडके , योगेश वराळे , आदि उपस्थित होते .