शिवराज विद्यालयाच्या २३ विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परीक्षेत यश ; ११ लाख ४ हजारांची शिष्यवृती

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेत येथील शिवराज विद्यालयाचे २३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून ११ लाख ४ हजारांची शिष्यवृत्ती पटकावली आहे .
शिवराज विद्यालयाचे एनएमएमएस
शिष्यवृती परीक्षेतील गुणवंत ( कंसात गुण )असे :
साकिब जहाखान आत्तार (१५० ),ओमकार सुरज सुतार (१४८ ), प्रियांका विजय पाटील (१४६),
साईराज संदीप रणवरे (१४५ ),हेमरजनी किरण कुमार पाटील (१४१ ), समृद्धी सुशांत गवाणकर (१४१ ),कार्तिक यशवंत हळदकर (१४० ), वेदांत सुनील करडे (१४० ),संध्याराणी बाजीराव पार्टे (१३९ ), वेदांत दत्तात्रय पाटील (१३८ ) , सिद्धेश सत्यजित भोसले (१३३ ),भक्ती भरत देवळे (१३२ ) , प्रेरणा प्रफुल कांबळे (१२९ ) ,सिद्धिका संतोष सातुसे (१२५ ),विशाल सिद्धगोंड पाटील (१२२ ), शुभम विश्वास कांबळे (१२२ ), आदित्य दत्तात्रय पाटील (१२० ), जान्हवी दीपक डवरी (११८ ) , पारस अमर आंगज (११६ ),यश प्रवीण रणवरे (१०९ ),दर्शन समाधान परीट ( १०४ ),
वरूण विक्रम कांबळे (१०१ ), संग्राम संजय शिंगारे (९६ )
आतापर्यंत शाळेचे २८२ शिष्यवृत्तीधारक बनले असून त्यांना एक कोटी सहा लाखांची शिष्यवृत्ती मिळाली आहे .सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक पी. डी. रणदिवे, एस एस सुतार, आर ए जालीमसर यांचे मार्गदर्शन लाभले .तर प्राचार्य बी.आर. बुगडे, खासदार संजयदादा मंडलिक, ॲड. विरेंद्र मंडलिक, कार्यवाह आण्णासो थोरवत, उप मुख्याध्यापक डी बी पाटील, पर्यवेक्षक एस पी कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले .