ताज्या बातम्याराजकीय

नितीन दिंडे यांची जनसेवा आबा म्हणण्याएवढी उत्तुंग : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार; श्री. दिंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचे सत्कार, बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटपासह विविध कार्यक्रम उत्साहात.

कागल :

कागलचे माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक व पक्षप्रतोद नितीन दिंडेनी जनसेवेला वाहून घेतले आहे. तरुण वयातही झोकून देऊन त्यांनी केलेली जनसेवा त्यांना आबा म्हणण्याएवढी उत्तुंग आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

दिंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कोरोना योद्धांचा सत्कार, बांधकाम कामगारांना सुरक्षा संचासह साहित्याचे वाटप व विविध कार्यक्रम अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर होते.

भाषणात मंत्री श्री. पुढे म्हणाले, नितीन दिंडे यांची कामाची पद्धत झोकून देऊन, तळमळीने व आक्रमक पद्धतीने काम करण्याची आहे. कोरोना काळात तर त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा करून निस्वार्थी भावनेने अनेकांना जीवदान दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे एखाद्या तरुण कार्यकर्त्याला जनता प्रेमाने आपुलकीने आबा म्हणते, हे जनतेशी एकरूप झाल्याचेच अत्यंत चांगले मूर्तिमंत उदाहरण आहे.

वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना नितीन दिंडे म्हणाले, माझा वाढदिवस हे फक्त निमित्त आहे. यानिमित्ताने स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांसाठी अहोरात्र झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा यथोचित गौरव करावा, हीच भावना मनात होती. प्रभाग क्रमांक दोन- श्रीमंत जयसिंगराव घाटगे पार्क व श्रमिक वसाहतमधील नागरिकांनी एवढं भरभरून प्रेम दिले आहे की, आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करीन.

केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, नितीन दिंडे हे एक हाडाचे कार्यकर्ते आहेत. राजकारण कमी व समाजकारण जास्त यात यांच्या कार्यपद्धतीमुळेच ते लोकाभिमुख झाली आहेत.

माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, नितीन दिंडे हे जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चोवीस तास उपलब्ध आहेत. कधीही हाक मारा, ते कोणत्याही परिस्थितीत मदतीला धावून येणार असा त्यांचा लौकिक आहे.

गौरव कोरोना योद्ध्यांचा…….

कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ.अजय केणी, डॉ. साईप्रसाद, अर्जुन आडनाईक, डॉ.अमित माने, डॉ.दिनेशसिंह चव्हाण, डॉ.अभिजीत कोराने, डॉ.सुनिता पाटील-कदम, डॉ.अभिजीत शिंदे, डॉ.सतिश पुरानिक, डॉ.रवींद्र बल्लूरगी, डॉ. उल्का चरापले, सामाजिक कार्यकर्ते बंटी सावंत, पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, मुख्याधिकारी पंडित पाटील या कोरोना योद्धांचा सत्कार झाला.

यावेळी व्यासपीठावर हिंदकेसरी दीनानाथ सिंह, जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील- बापू, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, नगराध्यक्षा सौ.माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी नगराध्यक्षा श्रीमती आशाकाकी माने, केडीसीसी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, आदिल फरास, राजेश लाटकर, विनायक फाळके, संदीप कवाळे, महेश सावंत, आर.व्ही पाटील, नंदू पाटील, दत्ता पाटील, जयदीप पोवार, विकास पाटील, शहाजी पाटील, भगवान कांबळे, राजू माने, सुनील माने, देवानंद पाटील, प्रमोद पाटील, रवी परीट, आशाकाकी जगदाळे, वर्षा बन्ने, माधवी मोरबाळे, नूतन गाडेकर, निलेश शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत एस. व्ही. राजूगडे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks