मुरगूड मध्ये शिवजयंती निमित्त मोफत शिवमूर्ती वाटप

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथे शिवजयंती घराघरात शिवजयंती मनामनात या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शिवभक्त मुरगुड कर शिवजयंती दिवशी मोफत मूर्ती वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे .
शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी आणि शिवरायांच्या विचारांचा जागर लहान थोरांमध्ये रुजावा, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिवजयंतीदिनी सकाळी 8.30 वाजेपासून वाजल्यापासून शिवतीर्थ मुरगड येथून या शिवमूर्ती वितरित केल्या जाणार आहेत ज्याप्रमाणे घरोघरी गणेशोत्सव साजरा होतो, त्या पद्धतीने मूर्ती घेऊन सर्व मूर्ती प् शिवभक्तांनी घरोघरी त्यांचे पूजन करावे असे आवाहन शिवभक्त मुरगूडकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
यावर्षी ची लहान मुले छोटा मंडळ स्थापन करून शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात अशा मंडळांना प्राध्यान्य देण्याचा संकल्प करण्यात आल्याचे तसेच गेल्यावर्षी 75 मूर्ती यावर्षी 2 फुटाच्या 50 मूर्ती वाटपाचे नियोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट ,ओंकार पोतदार, जगदीश गुरव ,तानाजी भराडे ,संकेत भोसले, प्रकाश पारिशवाड ,संकेत शहा,यांनी हे संपूर्ण नियोजन केले आहे.