संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
1 ऑगस्ट 2023 महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची जयंती, तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ते एक ख्यातनाम मराठी साहित्यिक होते.
अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले, कथा, कादंब-या, पोवाडे, लावण्या, लोकनाटये, पदे, गीते अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादाक्रांत केली. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले, शब्दांना अंगाराचे रूप देऊन बहुजनांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत.अश्या महान साहित्यिक यांच्या जयंती दिनी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. राजारामपुरी पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर विकास अडसुळ यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, भगवान कोइंगडे, प्रसाद जाधव ,संतोष खोत,
सचिन गुरव,सर्जेराव काळुगडे व कार्यकर्ते उपस्थित होते.