सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे कॉमर्स विभागातर्फे ‘करिअर गाईडन्स’ शिबिर

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत मार्गदर्शक चेतन गोडबोले निलया फाउंडेशन पुणे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे होते.
चेतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील विविध पर्याय, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसेच करिअर निवडताना लक्षात घ्यावयाच्या बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी “करिअरची दिशा ठरवताना आपली आवड, कौशल्ये आणि संधी यांचा संगम साधणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,
“विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणा देणे ही महाविद्यालयाची जबाबदारी आहे. करिअर गाईडन्ससारखे उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा योग्य वापर करून उज्ज्वल भविष्य घडविण्यास मदत करतात. शिक्षणासोबतच योग्य मार्गदर्शन मिळाले तर विद्यार्थी निश्चितच यशाच्या शिखरावर पोहोचतात.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कुंभार यांनी केले.
आभार प्रदर्शन करताना कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. विनोद प्रधान म्हणाले, “या करिअर गाईडन्स शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केलेल्या श्री. चेतन गोडबोले यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून प्रेरणादायी मनोगत व्यक्त करणारे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे, उप. प्राचार्य डॉ.शिवाजी पवार, ग्रंथालय प्रमुख सातपुते ,प्रा.राहुल बोटे ,प्रा.संदीप मोहिते ,प्रा.सुनील पाटील ,प्रा.स्वप्निल मेंडके , प्रा.राम पाटील, प्रा.हेरवाडे , प्रा.गोरुले ,प्रा.पाटील, कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे सर्व प्राध्यापक, कॉमर्स चे सर्व विद्यार्थी ,सूत्रसंचालन करणारी वैष्णवी कुंभार आणि उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे कॉमर्स विभागाचे सर्व विद्यार्थी यांचेही मनःपूर्वक आभार मानले.