ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुंबईमधील युवा अभिनेता निखिल आंब्रे याचा “आर्ट बिट्स फाउंडेशन” यांनी केला सन्मान.

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुंबईमधील युवा निखिल आंब्रे यांनी झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ,अगबाई सासुबाई,सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता,स्टार प्रवाह वरील मोलकरीण बाई झी युवा वरील साई बाबा, स्टार प्रवाह वरील लक्ष्य मालिका अशा मालिकेंमध्ये आपली छोटी मोठी भुमिका साकारली आहे.
अभिनयाबरोबरच त्यांना कवितेची सुध्दा आवड असल्याने त्यांनी स्वत: एक सुंदर अशी कविता लिहीली आहे “तुलाच पहावेेसे वाटते” असे या कवितेचे नाव आहे. या सुंदर कवितेला मुंबईकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.त्याबद्दल अभिनेते निखिल आंब्रे यांचे कौतुक देखील सर्वत्र होत आहे.तर त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आर्ट बिट्स फाउंडेशन यांनी यंदाचा युवा कला गौरव २०२१ हा पुरस्कार देऊन सन्मान केला.