ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक
निढोरी मध्ये निर्माल्य दानला शंभर टक्के प्रतिसाद

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील निढोरी येथे भक्तिमय वातावरणात घरगुती गणपतीचे विसर्जन झाले.
निढोरी ग्रामपंचायतीने केलेल्या मूर्ती आणि निर्माल्य दान आव्हानाला ग्रामस्थांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीने सांगितलेल्या ठिकाणी मूर्ती दान केले तर महिलांनी निर्माल्य नदी विहिरीत न टाकता एकत्र करून ग्रामपंचायतच्या ताब्यात दिले.यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने मूर्ती आणि निर्माल्य दान अभियानाला ग्रामस्थांच्या वतीने भरभरून प्रतिसाद मिळाला. नदीतील पाणी दूषित होऊ नये आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे निढोरी चे सरपंच अमित पाटील यांनी निकाल न्युज शी बोलताना सांगितले