ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शाहूवाडी : कोकरूड पुलावरून वारणा नदीत ट्रॅव्हल्स कोसळली

शाहूवाडी तालुक्यात कोकरूड पुलावरून वारणा नदीत ट्रॅव्हल्स कोसळल्याची घटना आज (दि.९) सकाळी ८ वा. च्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आज सकाळी सातच्या सुमारास पावलो कंपनीची ट्रॅव्हल्स (एआर११ए७५६७) गोवाहून मुंबईला शाहूवाडी-कराड मार्गे जात होती. शाहूवाडी- मलकापूर-अमेणी घाट मार्गे बस कोकरूड वारणा नदी पुलावर आली असता वळण रस्ता आणि भरधाव वेग यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस नदीत कोसळली. बसमधून ४० प्रवाशी प्रवास करत होते.