ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दूध दर निश्चितीसाठी शासनाकडून समितीची स्थापना

महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दर निश्चितीसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे.राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत दूध उत्पादक, सहकारी व खाजगी दूध संघ, पशुखाद्य उत्पादक कंपन्या व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत 22 जून रोजी कृषीमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत दुधाच्या दराबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दूध संघांकडून करण्यात येते.
दुधाच्या कृश काळात दूध उत्पादन कमी असल्याने, शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त भाव मिळतो. मात्र दुधाच्या पुष्ट्ट काळात दूध उत्पादन वाढल्याने, विविध खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दरात स्वीकारले जाते.