ताज्या बातम्यामहाराष्ट्र
डॉ. एन. डी. पाटील यांच्यावर उद्या दुपारी दोन वाजता होणार संस्कार; उद्या सकाळी ०८.०० ते दुपारी १२.०० पर्यंत होणार अंत्यदर्शन : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर :
कष्टकरी, शेतकरी व कामगारांचे नेते व ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार दि. १८ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत डॉ. एन. डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सदर बाजार – विचारे माळ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात ठेवले जाणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. कोरोना प्रोटॉकलमध्येच अंत्यसंस्कार होणार असल्याचेही ते म्हणाले.