मुरगुडमध्ये आजपासुन साखळी उपोषण , राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी ; बैठकीत ठराव

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथे मनोज जिरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाला सुरवात करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय नेत्यांनी वेळोवेळी सोयीस्कर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे या मराठा आरक्षणास विलंब लागत असून याबद्दल ठोस निर्णय होत नाही.
मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुरगूड शहरांमध्ये राजकीय सभांना बंदी घालण्याचा तसेच आज (ता. ३०) पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्धार येथील झालेल्या सकल मराठा समाज आणि मुरगुड शहर नागरिकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
अंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटील हे सध्या सरकारला दिलेल्या वेळ पूर्ण झाल्यामुळे त्यावर निर्णय न झाल्यामुळे पुन्हा उपोषणास बसले आहेत. राज्यातील वातावरण यामुळे तणावग्रस्त होत आहे. अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश करण्यात आली आहे याचाच भाग म्हणून मुरगूड शहरांमध्ये राजकीय सभांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मुरगुड शहर हे कागल तालुक्याच्या मध्यवर्ती शहर येत आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थ या उपोषणास बसणार आहेत असा निर्णय देखील आजूबाजूच्या गावातील उपस्थित ग्रामस्थांनी घेतला आहे.
उपोषणास मुरगुड शहरातील सर्व युवक ,तरुण मंडळे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच सकल मराठा समाजाची कागल तालुक्यातील सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुरगूड शहरासह आजूबाजूच्या गावातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.