बटकणंगले येथे विद्यार्थाना सैनिकी जीवनाबाबत मार्गदर्शन

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
महात्मा फुले हायस्कूल बटकणंगले चा माजी विद्यार्थी व बेळगाव येथील सैन्य दलात कार्यरत असणारे नायब सुभेदार शिपूरचे सुपुत्र जानबा तुकाराम शिखरे यांच्या विशेष प्रयत्नाने बटकणंगले येथील महाराष्ट्र छात्र सेनेच्या व वि.मं.शिपुर च्या विद्यार्थ्यांना सैनिकी जीवनाची माहिती जाणून घेण्याची संधी प्राप्त झाली.
यावेळी भारतीय सैन्य दलात कमांडोजना प्रशिक्षण कसे दिले जाते याची प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळाली. यावेळी श्री शिखरे यांनी कमांडो च्या कार्याची माहिती सांगितली युद्ध किंवा भूकंप परिस्थितीत हेलिकॉप्टरचा कसा उपयोग केला जातो तसेच दुसऱ्या महायुद्धासह मुंबई व दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्य दलाने कशी कामगिरी केली याची ही माहिती यावेळी सांगण्यात आली. याशिवाय विषारी बिनविषारी साप कसे हाताळायचे याची प्रात्यक्षिके ही दाखविण्यात आली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक विजय गुरबे, पवन सूर्यवंशी, शिपूरचे सरपंच सचिन गुरव, पो.पाटील भरमा गुरव, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, रामदास गुरव, शिक्षिका ए एम येसने,सौ. शिंत्रे, पाटील , बारदेसकर इत्यादींच्या सह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.