ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चाचणी लेखापरीक्षण तपासणी अहवालाची प्रत मिळावी ; युवराज पाटील यांची लेखापरीक्षण यांचेकडे शिष्टमंडळासह फेर मागणी

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चाचणी लेखा परीक्षण करण्याचे आदेश यापूर्वी दिलेले आहेत. त्यांच्या आदेशानुसार श्री युवराज पाटील यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सदर चाचणी लेखापरीक्षण अहवालाची प्रत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था ( लेखापरीक्षण) यांचेकडे मागणी केली आहे.

परंतु ती अद्याप दिली नसल्याने पुन्हा युवराज पाटील यांनी शिष्टमंडळासह मा. दि.तू छत्रीकर
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था ( लेखापरीक्षण) यांचेकडे सदरची प्रत मिळणे बाबत व या संदर्भात जिल्हा बँकेकडे काय पत्रव्यवहार झालेला आहे याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी जिल्हा तपासणी अधिकारी किरण पाटील उपस्थित होते.

यावेळी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) यांनी सरसेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखाना व ब्रिक्स इंडिया चालवीत असलेल्या अप्पासाहेब नलवडे हरळी गडहिंग्लज या दोन कारखान्यांना वेळोवेळी मंजूर केलेल्या कर्जाची कागदपत्रे उपलब्ध करण्यासंबंधी जिल्हा बँकेकडे झालेल्या पत्रव्यवहाराच्या छायांकित प्रती सोबत जोडून हा लेखापरीक्षण अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे कळवले आहे.

परंतु हा लेखापरीक्षण अहवाल केव्हा देणार ? किंवा जिल्हा बँकेकडून तपासणी संदर्भात संदर्भात तपासणी कामी काही कागदपत्रे येणे बाकी आहेत का? त्यामुळे हा अहवाल तयार करणेस उशीर होत आहे. याचा स्पष्ट खुलासा केलेला नाही.

यावर पुढचे पाऊल म्हणून या शिष्टमंडळाने मा. सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर याचीही भेट घेऊन संबंधित विभागाकडून हा लेखापरीक्षण अहवाल देणे बाबत टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. व यामध्ये स्वतः लक्ष घालून हा तपासणी अहवाल सत्वर देणेबाबत संबंधित विभागास आदेश देणे बाबत विनंती केली आहे.

या शिष्टमंडळात युवराज पाटील यांच्यासह, एम पी पाटील, दत्तामामा खराडे ,संजय पाटील, प्रा.सुनील मगदूम, उत्तम पाटील, प्रदीप पाटील ,धनंजय तेलवेकर, रंगराव तोरस्कर, प्रताप पाटील, आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks