ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल : गहिनीनाथ गैबीपीर देवाला पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्याकडून गलेफ ; जनतेची सुख-समृद्धी आणि कल्याणसाठी केली प्रार्थना

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागलचे ग्रामदैवत श्री. गहिनीनाथ गैबीपीर देवाला वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते मानाचा गलेफ घालण्यात आला. कागल उरसाचा मानाचा हा चौथा गलेफ होता. गैबी देवस्थानच्या उरुसानिमित्त मुश्रीफ कुटुंबीयांच्यावतीने या गलेफाचे आयोजन केले होते.
नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी समस्त जनतेला सुख-समृद्धी मिळून कल्याण होऊ दे’, अशी प्रार्थना केली.
यावेळी सौ. सायरा हसन मुश्रीफ, अन्वर मुश्रीफ, साजिद मुश्रीफ, सौ. सबीना मुश्रीफ, अबीद मुश्रीफ, सौ. नबीला मुश्रीफ, नवीद मुश्रीफ व सौ. अमरीन मुश्रीफ, कु. उसेद मुश्रीफ, कु. राईद मुश्रीफ, कु. माजीन मनगोळी उपस्थित होते.