निपाणी- मुरगुड रोडवर गाय दूध कपातीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन ; आंदोलकांची पोलिसांकडून धरपडक

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गोकुळ दूध संघाने 2 ऑक्टोबर पासून गायीचा दूध दर दोन रुपये कमी केला असल्याने दूध उत्पादक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शनिवारी म. न से च्या कार्यकर्त्यांनी बिद्री बोरवडे येथील शीतकरण केंद्राची तोडफोड केल्यानंतर रविवारी लगेच सोनगे व सुरुपली येथील दूध उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलन केले.सकाळी 8 वाजता सुरुपली येथे निपाणी राधानगरी या रस्त्यावर येथील दूध उत्पादक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
दूध उत्पादकांनी भर रस्त्यावर ठिय्या मांडून गाय दूध दर कपाती विरोधात घोषणा दिल्या.बिद्री बोरवडे शीतकरण केंद्राची तोडफोड केली असल्याने मुरगूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता दरम्यान बिद्री बोरवडे शीतकरण केंद्राचे दूध संकलन अधिकारी सर्जेराव पाटील, शाखा प्रमुख विजय कदम यांच्याकडे गोकुळ दूध संघाने दूध दर कपात माघे घेणे बाबत आंदोलकानी लेखी निवेदन देऊन आंदोलन तात्पुरते थांबवले.
सोनगे येथे सकाळी 10 वाजता येथील गाय दूध उत्पादकानी रास्ता रोको आंदोलन केले येथील दूध उत्पादकानी निपाणी राधानगरी रस्त्यावर बसून गाय दूध कपात केल्या बाबत गोकुळचे चेअरमन व संचालक यांच्या विरोधी घोषणा दिल्या दूध उत्पादक चांगलेच आक्रमक झाल्यानंतर बिद्री बोरवडे शीतकरण केंद्राचे दूध संकलन अधिकारी सर्जेराव पाटील व शाखा प्रमुख विजय कदम यांच्याकडील दूध दर कपात माघे घेण्याबाबत लेखी निवेदन स्वीकारले आक्रमक आंदोलकांना पोलीसानी पकडून नेले व सोडून दिले.
सोनगे व सुरुपली येथे रास्ता रोको आंदोलनावेळी मुरगूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी चार पोलीस अधिकारी पंचवीस पोलीस होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.