ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा नियोजनच्या निधी खर्चाचे नियोजन फेब्रुवारी अखेर करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना ; जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खर्च करावयाच्या विकासनिधीच्या खर्चाचे नियोजन फेब्रुवारीअखेर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. दरम्यान; कोल्हापूर शहरातील खड्डे नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी भरा, अशा सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.

बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी भरीव निधी देऊन रस्ते चकाचक करू, असे सांगितले. तोपर्यंत नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील खड्डे भरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. आरोग्य विभागाच्या चर्चेत मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आरोग्य विभागाची प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये ही व्यवस्था बळकट करा. त्यामुळे, जिल्ह्याच्या ठिकाणावरील सिव्हील ल हॉस्पिटलांवरील ताण कमी येईल.

या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी शिक्षण, आरोग्य, कृषी, विशेष घटक योजना, काळमवाडी धरणाची गळती या विषयांचाही आढावा घेतला.

या बैठकीला आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सौ. सुप्रिया देसाई, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. प्रकाश गुरव या प्रमुखांसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks