ताज्या बातम्या
चंदगड तालुक्यातील बेकायदेशीर गुटखा दारू तात्काळ बंद करा : संदीप नांदवडेकर

कोल्हापूर प्रतिनिधी:
चंदगड तालुक्यातील अवैध रित्या चालू असणाऱ्या बेकायदेशीर दारू व मटकावर कारवाई करण्याची मागणी निवेदनादव्यारे चंदगड कॉग्रेसचे युवाअध्यक्ष संदीप नांदवडेकर यांनी केली आहे.
चंदगड मध्ये गेले अनेक दिवस मटक्याचे व बेकायदेशीर दारू आणन्याचे प्रमाण वाढले असून यामुळे युवा पिढी आकर्षित होतं आहे. अनेक युवकांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतं असून यावर तात्काळ आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्रवरे केली आहे. यावेळी मनसे चंदगड तालुका अध्यक्ष राज सुभेदार,प्रसाद वाडकर, शुभम गावडे, अमृत गावडे, राजाराम पाटील उपस्थित होते.