मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेजमध्ये करिअर कौन्सिलिंग प्रोग्रॅम संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथे करियर कौन्सिलिंग प्रोग्रॅम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.आर .पाटील. यावेळी विवेक माळवे व नितीन हरुगडे या दोन प्रमुख उपस्थित मान्यवरांनी सी.ए या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उद्योग व्यवसायाच्या नोकरीच्या वाटा शोधात असताना विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने आत्मविश्वासाच्या बळावर सामोरे जावे सीए सारखे क्षेत्रामध्ये रोजगाराच्या वाटा उपलब्ध आहेत सीए होणाऱ्या मध्ये मुलींची संख्या अधिक प्रमाणात आहे त्यामुळे मुलांनीही या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता सीए होणे गरजेचे असल्याचे मत विवेक माळवे व नितीन हरगुडे यांनी व्यक्त केले. प्राचार्य एस. आर. पाटील यांचे यावेळी भाषण झाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख एम. ए. बसर्गे यांनी केले कार्यक्रमास शिक्षक प्रतिनिधी टी. एस. पाटील, टी. आर. शेळके, पी. एस. पाटील, आदी मान्यवर हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. के. पाटील यांनी तर आभार आर.सी. कांबळे यांनी मानले