ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पन्हाळा : वेतवडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनायक कांबळे तर उपाध्यक्षपदी पुजा गुरव यांची निवड .

कळे -वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनायक शामराव कांबळे तर उपाध्यक्षपदी पुजा अशोक गुरव यांची एकमताने निवड करणेत आली . मुख्याध्यापक जयवंत चौगले यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले . निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करणेत आला .
यावेळी सदस्य दिलीप माने,आरती वसंत सुतार,संभाजी पाटील ,सुरेखा युवराज पाटील ,लता हिंदुराव पोवार,छाया शिवाजी पाटील उपस्थित होते .शालेय व्यवस्थापन समिती निवडीची बैठक उत्साहात पार पडली.शाळेच्या सर्वांगीन विकासासाठी समिती नेहमीच प्रयत्नशील राहील.पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून करणेत आले.