ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सारथी च्या विविध योजनांबाबत शिंदेवाडी च्या संग्राम खराडे यांनी केला जनजागृतीपर प्रसार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेऊन शिंदेवाडी येथील संग्राम भरत खराडे (Sarthi ph.D studant csmnrf-2019 ) यांनी शिंदेवाडी ता. कागल येथे जागृती करण्याचे काम केलेले आहे. यावेळी शिंदेवाडी गावच्या सरपंच  रेखा रमेश माळी ग्रामपंचायत सदस्य  ऍड जीवनराव पुंडलिक शिंदे, ग्रामसेवक विजय पाटील, अरविंद ईश्वरा शिंदे , नामदेव सखाराम शिंदे, रवींद्र जयसिंग शिंदे ,सुनील बाळू शेलार इत्यादी मान्यवर पालक विद्यार्थी महिला उपस्थित होत्या.

संग्राम भरत खराडे यांनी सारथी संस्थेची स्थापना त्यांची मुख्य कार्यालय विभागीय कार्यालय व त्या माध्यमातून मराठा ,मराठा कुणबी व कुणबी मराठा यांच्यासाठी काम करीत असून तसेच यूपीएससी, एमपीएससी ,परदेशी भाषा, सेट नेट ,M.phil,phD ,छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास कार्यक्रम इंडो जर्मन टूल रूम राजमाता जिजाऊ सार्थक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारे योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना यावर नमूद केलेल्या घटकांसाठी राबविण्यात येत असून भविष्यकालीन योजनांचा आराखडा याबाबत वाचन करत असताना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी शिंदेवाडी गावचे ग्रामसेवक विजय पाटील यांनी सारथीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तरपणे माहिती पालकांना विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना दिली त्यामुळे अनेकांना यातून पुढील दिशा मिळणार आहे असे सांगत त्यांच्या आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks