ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पन्हाळा तालुक्यातील पणोरे येथे अवैध दारू विक्री जोमात. कळे पोलीस ठाण्याचा आशीर्वाद??

कळे प्रतिनिधी : अनिल सुतार

पन्हाळा तालुक्यातील पणोरे येथे सध्या अवैद्य दारू विक्री जोरदार सुरू असून कारवाई झाली तरी पुन्हा हा धंदा सुरू होतो त्यामुळे येथील अवैध दारू विक्रेत्यांना कळे पोलीस ठाण्याचे अभय असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.

येथील अवैध दारू विक्रीवर धाड पडायची असल्यास त्याची माहिती आधीच दारू विक्री वाल्यांना कशी काय मिळते? याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. असे असताना कळे पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागाने डोळ्यावर हात ठेवण्याची भूमिका घेतली असून पणोरे परिसरात अवैध दारू विक्री जोमाने सुरू असल्याचे चित्र आहे. येथील गावच्या मुख्य वस्तीतच अवैद्य देशी दारू विक्री सुरू असून गावा शेजारीच भागातील एक मोठे महाविद्यालय आहे त्यामुळे अनेक युवक शिक्षण घेत असताना यामध्ये गुरफडले जात असल्याने परिसरात अवैध दारू विक्री हा चर्चेचा व चिंतेचा विषय बनत चालला आहे.

त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस अवैध दारू विक्री व्यवसाय वाढत चालला आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणारा कामगार वर्ग व युवक हे दारूच्या व्यसनात अडकत जाऊन अनेक संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.कळे पोलीस ठाण्याचा आशीर्वाद व राजकीय पुढाऱ्यांचा वशिला यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नसल्याचे दिसून येत असून पणोरे परिसरातील दारू विक्री कधी बंद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे? त्यामुळें राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे जिल्हाप्रमुख व कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिकारी महेंद्र पंडित या गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर व यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks