कागल : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादात शाहू कृषी प्रदर्शनाची सांगता ; ड्रोन, ट्रॅक्टर, चारचाकी गाड्यांसह विविध अवजारांची विक्री व बुकिंग

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथे गेले चार दिवस सुरू असलेल्या राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनाची शेतकऱ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादात आज सांगता झाली. या प्रदर्शनामध्ये ड्रोन, ट्रॅक्टर, पावर टिलर, मिनी ट्रॅक्टर चारचाकी गाड्या विविध शेती उपयोगी अवजारे यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला.
श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलच्या मैदानावर हे प्रदर्शन शुक्रवारपासून सुरू झाले होते.शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू ग्रुप, राजे फाउंडेशन तिरुमला ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रदर्शन स्थळी ड्रोन द्वारे फवारणी कोठारी पाईप व ट्रॅक्टर तसेच कडबाकुट्टी यंत्राचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.
शेती विषयक खते औषधे व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खरेदी केले. घरगुती वापरातील वस्तू, शेती विषयक पुस्तके सेंद्रिय उत्पादने,व दैनंदिन वापरातील इतर वस्तूंचीही चांगाली विक्री झाली.
खिलार जनावरांचे स्पर्धेतील विजेत्या पशुपालकांना बक्षीस वाटप केले. तर सहभागी स्टॉलधारकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सुवर्ण सुगरणच्या स्टॉलवरील बचत गटांच्या वस्तुंना मागणी………..
या प्रदर्शनातील राजमाता जिजाऊ महिला समितीच्या सुवर्ण सुगरण स्टॉलवरील बीट, टोमॅटोपासून बनवलेले पापड, विविध प्रकारची घरगुती पद्धतीने तयार केलेली लोणची, चटण्या, मसाले,मेतकुट व इतर पदार्थाच्या विक्रीस चांगला प्रतिसाद मिळाला.