चंदगड : मलतवाडी येथे सेवानिवृत जवान प्रकाश पाटील यांचा सत्कार

चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
मलतवाडी गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान प्रकाश मायापा पाटील 7 मराठा लाईट इन्फंट्री हे सैन्यातून MACP नायब सुभेदार या पदावरून मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर बेळगाव येथून 1 ऑगस्ट 2023 रोजी 24 वर्ष इतकी देशसेवा बजावून सेवानिवृत्त झाले.
त्यांचा अल्प परिचय थोडक्यात जवान प्रकाश पाटील हे सैन्यात मराठा एल आय रेजिमेंट सेंटर बेळगावला सोल्जर जी डी या पदावर 10 जुलै 1999 ला भरती झाले या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती अंदमान निकोबार येथे झाली.
यानंतर त्यांनी जे के ,17 आर आर जे के,नवी दिल्ली,उरी सेक्टर जे के,गुजरात गांधीनगर,अरुणाचल प्रदेश लुम्पो,राजस्थान सुरतगड,जे के नौशेरा, यु एन मिशन साऊथ आफ्रिका कांगो, कानपुर व शेवटी बेळगाव आदी ठिकाणी त्यांनी लान्स नायक,नायक,हवालदार व MACP नायब सुभेदार आदी पदावरून त्यांनी विशेष उल्लेखनीय सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले.
सेवनिवृतीनिमित त्यांची सपत्नीक उघडया जीप मधून श्री मायाप्पा मंदिरपासून घरापर्यंत प्रा नामदेवराव दुंडगेकर हायस्कुलच्या झांजपथक व श्री मायाप्पा लेझीम पथक यांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सरपंच सौ भारती सुतार,उपसरपंच जयवंत पाटील व सर्व सदस्य ,ग्रामस्थ,आजी माजी सैनिक संघटना व तंटा मुक्त कमिटी यांच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,आहेर देऊन सत्कार झाला.
यावेळी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक तसेच 1997-98 क्लासमेंट ग्रुप ,सर्व ग्रामस्थ उपस्थित होते त्यांच्या या जीवनप्रवासात पत्नी सौ मनीषा,मुलगा साहिल,मुलगी साक्षी,आई सौ अनुसया,वडील मायाप्पा पाटील यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.