स्व. राजे विक्रमसिंह घाटगे जयंतीनिमित्त काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहतीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंतीनिमित्त काळम्मावाडी धरणग्रस्त वसाहत येथे काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त कार्यक्रम झाला. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी श्रीमती साधना पाटील होत्या.
यावेळी दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सौ.घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलीस भरती झालेल्या राघव बोते व सोहा चव्हाण यांचाही सत्कार केला. तसेच आयुष्यमान कार्ड वाटपही केले
यावेळी डोंगरी विकास समितीच्या सदस्या विजया निंबाळकर ,शारदा गुरव, माधुरी गाडेकर, शाहूचे संचालक यशवंत माने,युवराज पसारे, किरण राऊत संदीप शिंदे हरी व पाटील मेजर वरक,मारुती यादव मुलाजी झांजे आदी उपस्थित होते.स्वागत समीर पाटील यांनी केले. सायली पाटील यांनी आभार मानले