ताज्या बातम्यामहाराष्ट्र

50 हजाराच्या लाचप्रकरणी पोलिस अधिकार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकास 50 हजार रूपयाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना 15 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शंकर धोंडिबा कुंभारे (43, पोलिस उपनिरीक्षक, विश्रामबाग पोलिस स्टेशन, पुणे शहर) असे लाच घेणार्‍या पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर कुंभारे हे विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांच्याकडे तक्रारदार यांच्याविरूध्दच्या तक्रारी अर्जाची चौकशी देण्यात आली होती. तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल न करण्यासाठी पीएसआय शंकर कुंभारे यांनी तक्रारदाराकडे सुरूवातीला 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. दरम्यान, तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये पीएसआय शंकर कुंभारे यांनी तडजोडीअंती 30 हजार रूपयाची लाच घेण्याचे मान्य केले. त्यापैकी 15 हजार रूपयाची लाच घेताना पीएसआय शंकर कुंभारे यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सरकारी पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूध्द विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks