ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुडमध्ये भाजप युवा मोर्चाची रॅली

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पंतप्रधान मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील भाजप युवा मोर्चाच्या वतीने शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी प्रदेश भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सरचिटणीस व महामंत्री सुदर्शन पाटसकर म्हणाले, भाजप सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचवावी. तसेच २०२४ ला पंतप्रधान मोदींचे सरकार व विधानसभेला समरजितसिंह घाटगे यांना विजयी करण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी कामाला लागावे, असे आवाहन केले.
यावेळी विशाल पाटील, अमोल शिवाई, प्रियाताई पोवार आदींनी मते मांडली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, विश्वजितसिंह पाटील, पृथ्वीराज यादव, संजय पाटील, दत्तामामा खराडे यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.