आरोग्यताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र

महाराष्ट्रात ओमायक्रॉनची एंट्री! पिंपरीत ६, तर पुण्यात आढळला १ रुग्ण

पुणे :

कल्याण, डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर आता पुण्यातही ओमायक्रॉचे ७ रुग्ण (पुण्यात ओमायक्रॉनची एंट्री) आढळून आले आहेत. यापैकी पुणे शहरात १ तर पिंपरी चिंचवडमध्ये ६ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. त्या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांचे संपर्कातील आहेत.

पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरूषाला या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिद्ध झाले आहे. पिंपरीमधील सहाही रुग्ण एकाच कुटूंबातील आहे. नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून ४४ वर्षीय महिला तिच्या भावाला पिंपरी चिंचवडला भेटण्यासाठी आली होती. तिच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ यासह त्याच्या दोन्ही मुली, असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी संध्याकाळी दिला आहे.

नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक २४  नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिद्ध झाले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks