ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड पोलिस ऍक्शन मोड मध्ये ; फासेपारध्यांना परत त्यांच्या गावी पाठविले

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड शहरात गेल्या दोन तीन महिन्यापासून मोठ्या चोऱ्या होत आहेत. विशेषता बंद घरे फोडली जात आहेत.मुरगूड मधील नागरिकांच्या शिष्ठमंडळाने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता .
शहरात फिरणारे विक्रेते आणि अनोळखी फिरस्ते यांचा बंदोबस्त करावा तसेच गस्तही घालावी असे या निवेदनात म्हंटले होते.मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी त्यांना कारवाईचे आश्वासन दिले होते.

कालच फासेपारधी लोकांचा एक तांडा मुरगूड शहरात दाखल झाला.त्याबद्दल शिवभक्तांनी पोलिस ठाण्याला कळविले.त्यानंतर मुरगूड पोलिसांनी लगेच ॲक्शन घेतली. दोन कॉन्स्टेबल फासेपारधी वस्तीवर पाठवले व ओळख पत्रांची विचारणा केली.त्या लोकांना ओळख पत्रे किंवा तत्सम कांहीं पुरावे देता आले नाहीत.नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन पोलिसांनी त्या फासेपारधी लोकांना त्यांच्या कुटुंबीया सह बस स्थानकावर आणले व एस टी बस मधून कोल्हापूरला पाठवले.

सोबत दोन कॉन्स्टेबल जोडून दिले.कायदा व सुव्यवस्था यांचे पालन करत असताना पोलिसांनी माणुसकी सुद्धा दाखविली.भटके लोक पोट भरण्यासाठी आले असले तरी शहरात घडलेले अनेक चोरीचे प्रकार पाहता विषाची परीक्षा कशाला घ्यायची म्हणून त्या भटक्या लोकांना सहानुभूती दाखवून त्यांच्या गावी पाठविले.मुरगूड मधील शिवभक्तांचे सुद्धा त्यांना सहकार्य लाभले.

यावेळी मुरगूड स्टेशनचे कर्मचारी राजेंद्र जगत,पोलीस कॉन्स्टेबल हिंदुराव पाटील शिवभक्त सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट, रघुनाथ बोडके, ओंकार पोतदार, जगदीश गुरव यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks