कुरुकली येथे छत्रपती शिवाजी कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्तींचे केले पुनर्विसर्जन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कुरुकली ता. कागल येथील छत्रपती शिवाजी कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपती विसर्जनानंतर काठावर पुन्हा वाहून आलेल्या गणेश मूर्तींचे नदीमध्ये खोलवर जाऊन विसर्जन केले .यामध्ये १५० हून अधिक घरगुती मूर्ती यांचा समावेश होता.
१४ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता वेदगंगा नदीच्या काठावर मंडळाचे सर्व कार्यकर्ते जमा झाले, सर्वांनी नदीपात्रात उतरून काठावर वाहून आलेल्या गणेश मुर्ती यांची मानवी साखळी करून आत मध्ये जात पुनर्विसर्जन केले. याचबरोबर नदी काठावरील असलेला कचरा काढूनही टाकला व नदीच काठ स्वच्छ केला.
पाण्यामध्ये नागरिकांनी फोटो फ्रेम विसर्जन केल्यामुळे त्यांच्या काचा पाण्यामध्ये लागत होत्या लोखंडाचे स्ट्रक्चर आणि पायामध्ये आलेला गणपती गणेश मूर्ती यांची विटंबना होऊ न देता एका बाजूने सर्व गणेश मूर्ती काढून घेत त्यांना खोलवर विसर्जित करण्यात आली .या उपक्रमामुळे गावामध्ये व परिसरात या मंडळाचे कौतुक होत आहे.
गणेश विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे अनेकांनी मुर्त्या काठावर विसर्जन केल्या होत्या. पण पाण्याची पातळी कमी होत गेल्याने काठावरील देखील मुर्त्या मोठ्या प्रमाणात जमा झाल्या होत्या .त्या सुरक्षित आत नेऊन त्यांचे पुनर्व विसर्जन केले.
या उपक्रमात विकासराव हंबीरराव पाटील, बाळासो आनंदा पाटील माजी सरपंच कुरुकली, अमित बंडासो कांबळे,प्रकाश महादेव दाभोळे , तानाजी दिनकर पाटील ,दयानंद धोंडीराम कुंभार, संतोष कृष्णा पाटील ,विनायक प्रकाश कुंभार, गणेश जोतीराम पाटील ,आदित्य महेश पाटील, मृणाल विलास पाटील ,विजय नेताजी पाटील, संग्राम सदाशिव पाटील, अनिकेत कृष्णा पाटील,मयूर मोहन भोसले, जयदीप पांडुरंग बेलवलेकर, साहिल शिवाजी पाटील ,विघ्नेश सुखदेव पाटील ,पंडित रखु पाटील ,अनिकेत बाबुराव दाभोळे, राजेंद्र हिंदुराव पाटील ,शिवम संतोष पाटील ,वीरेन अमर कांबळे, सागर शिवाजी कुंभार ,सचिन शिवाजी कुंभार, इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.