मुरगुड येथील सरपिराजीराव तलाव ओसंडला ; मुरगुडसह दोन गावांचा पाणीप्रश्न मिटला

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता कागल येथील शतकाकडे वाटचाल करणारा ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव ३७ फूट ३ इंच फूट इतक्या पूर्ण क्षमतेने भरून ४०० फूट लांबीच्या सांडव्यावरून आज ( दि-२९ जूलै ) सकाळी ४.३० वा. ओसंडून वाहात आहे . त्यामुळे मुरगूड,शिंदेवाडी, यमगे गावांना पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा व २२५ एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्र मार्गी लागला आहे .
मुरगुड येथील सरपिराजीराव तलाव हा ऐतिहासिक आहे .३७ फूट ३ इंच उंचीच्या,तीन चौरस मैल परीघ असलेल्या अन १२० एकरात दहा कोटी २२ लाख १९ हजार ९८० घनफूट इतका पाणी संचय होतो . या तलावातून २२५ एकर शेतीसह मुरगूड, शिंदेवाडी ,यमगे या गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो .
शंभरीकडे वाटचाल करणारा ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने ( ३७ , ३ फूट ) ओसंडून वाहत आहे .१९७२ साली३२ फूट,१९८७ ला ३६,९ फूट, २००१ साली ३२,३ फूट, २००३ ला ३३,६ फूट तर २०१५ ला केवळ २५,९ फूट या पाच वर्षात तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही .२०१५ साली केवळ २५ , ९ फूट इतका पाणीसाठा असल्याने मुरगूड, शिंदेवाडी व यमगे या गावांना तीव्र पाणीटंचाईस तोंड दयावे लागले होते . या वर्षीही सरपिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्याने तीन गावच्या पिण्याच्या पाण्याचा व २२५ एकर शेतीचा प्रश्र मार्गी लागणार आहे .