मुरगूड मध्ये वृक्ष वाढदिवस, रोपांचे वाटप, वृक्षारोपण व बियांची हवाई पेरणी आदी उपक्रमांनी पर्यावरणदिन साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व वनश्री मोफत रोपवाटिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनी वृक्षांचा वाढदिवस, रोपांचे वाटप व परिसरातील डोंगर माथ्यावर बियांची हवाई पेरणी अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये मुरगूड नगर परिषदेचे आरोग्य विभाग व आस्थापना विभाग यांनीही सहभाग दर्शविला.
मुरगूड येथील बाजारपेठेत १८ वर्षापूर्वी लावलेल्या सप्तपर्णी व गुलमोहर या वृक्षास हार अर्पण करून व केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार विजेते डाॅ.मा ग गुरव यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. बहुजन जागृती संस्थेचे संस्थापक एम टी सामंत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. निसर्ग मित्र मंडळ अध्यक्ष वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी, निसर्गवेद संस्थेचे अध्यक्ष प्रा. महादेव सुतार, उद्योगपती मयूर आंगज, नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक स्नेहल नरके, कलाध्यापक संदीप मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या प्रेरणेतून गेली २९ वर्षे पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने कार्यरत असणाऱ्या वनश्री मोफत रोपवाटीका व मुरगूड शहर मित्र मंडळ यांच्यावतीने प्रतीवर्षी परिसरातील डोंगर माथ्यावर विविध वृक्षांच्या लाखो बियांची हवाई पेरणी करण्यात येते. या वर्षीही पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील बाजार पेठेतील सप्तपर्णी वृक्षांचा वाढदिवस राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डाॅ.मा ग गुरव यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.तर या वृक्षांची पूजा वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी बोलतांना डॉ गुरव म्हणाले, वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी मुरगूड परिसरामध्ये सुरू केलेले पर्यावरण संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद असून पर्यावरणाचा ढासळणारा समतोल सावरण्याचा तो एक महान प्रयत्न आहे.
याप्रसंगी मुरगूड नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता रोहित अतवाडकर, आरोग्य विभाग प्रमुख सचिन भोसले, शहर समन्वयक विपुल अपराध, आस्थापना विभाग प्रमुख सुरेखा वडर, लेखापाल मनाली शिंदे, लेखापरीक्षक अंजली हजारे, सहाय्यक मिळकत व्यवस्थापक तृप्ती पाटील, महसूल विभाग प्रमुख उत्तम निकम, सुनील पाटील, प्रतीकसिंह पाटील आदिंसह नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळाच्या पृथ्वीराज सावर्डेकर, मृत्युंजय सुर्यवंशी, आदित्य बरगे, प्रथमेश चव्हाण, शकलीन भडगावकर, विजय माने आदींनी सक्रिय सहभाग घेतला. यानंतर उपस्थितांना मान्यवरांचे हस्ते वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.
स्वागत प्रास्ताविक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी तर आभार प्रा.महादेव सुतार यांनी मानले.