आदमापूर येथे बाळूमामा भंडारा यात्रेनिमित्त मुरगूड मेकॅनिकल टू व्हिलर असोसिएशन मार्फत मोफत टू व्हीलर दुरुस्ती सेवा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बाळूमामा भंडारा यात्रा उत्सव काळात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मोफत टू व्हिलर दुरुस्ती व मोफत पंक्चर काढून देण्याची सेवा करण्यात आली आहे. ही सेवा मुरगूड येथील मिनल ऑटोमोबईल व मुरगूड मेकॅनिकल टू व्हिलर असोसिएशन मुरगूड यांच्यातर्फे प्रतिवर्षी देण्यात येते.
यासाठी दिपक माने, यशवंत भाट, अमोल पाटील, गोविंद मोरबाळे, संग्राम ढेरे, विनायक भोसले, अशोक मांगले ,अमोल मांगले ,किरण गवळी, युवराज साळसकर,सर्जेराव खराडे,पांडुरंग चितळे,दगडू मांगोरे,ऋषिकेश चव्हाण, सागर सूर्यवंशी,दिगंबर कपले,सुहास कांबळे,अक्षय शिंदे, राया ठेंगे, विजय खराडे,प्रकाश गोंधळी,आकाश आरेकर,आकाश भाट यांच्यासह अनेक मेकॅनिक ही सेवा विनामूल्य देत आहेत.
यावर्षीही ही सेवा दि 25, 26,27 या तीन दिवशी 24 तास देत आहेत.आतापर्यंत 65 ते 70 गाड्यांची विनामूल्य सेवा करण्यात आलेली आहे. ही सुविधा आदमापुरातील भक्तनिवास शेजारी करण्यात आली आहे . नादुरुस्त दुचाकीस्वाराने संपर्क केल्यास आवश्यकतेनुसार जागेवर जाऊन गाडीची दुरुस्ती करून दिली जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमोल पाटील -9423278183
गोविंद मोरबाळे – 9421103495
संग्राम ढेरे – 9075698484
विनायक भोसले – 9421102013