मुरगुड : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा रविवारी सत्कार सोहळा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता – कागल येथे रविवार दि – ३० जुलै रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमासाठी बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के.पी.पाटील प्रमुख पाहुणे म्हणून तर बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याची माहिती अॅड सुधीर सावर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ए वाय पाटील, शितलताई फराकटे, विकास पाटील, सूर्यकांत पाटील, रणजीत सूर्यवंशी
अॅड जीवनराव शिंदे , संजय मोरबाळे, स्वाती शिंदे राजवर्धन मसवेकर, प्रतीक्षा शेणवी, नेहा चौगले, अंकिता शिंदे , अनिल बोटे , सुनील गुजर ,आराध्या दबडे व महापुरातही जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत ठेवणा-या वीज कर्मचार्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे .
यावेळी युवराजबापू पाटील, प्रताप उर्फ भैया माने, नवीद मुश्रीफ, गणपतराव फराकटे, मनोज फराकटे,विकास पाटील पंडितराव केणे धनाजीराव देसाई उमेश भोईटे प्रवीण सिंह भोसले जगदीश पाटील आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच मुरगुड परिसरातील ग्रामपंचायतचींचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेस सुधीर सावर्डेकर, दिगंबर परीट, राजू आमते, नामदेव भांदिगरे ,अमर देवळे, राहुल वंडकर ,सम्राट मसवेकर,दिग्विजय चव्हाण उपस्थित होते.