ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शिवजयंती निमित्त बुधवारी कागलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन ; शाहू ग्रुप व छत्रपती शिवाजी महाराज जयंती लोकोत्सव समितीतर्फे संयोजन

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी(ता.१९) शाहू ग्रुप व छत्रपती शिवाजी महाराज जयंती लोकोत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
सकाळी आठ वाजता शिवज्योतीचे आगमन होईल.त्यानंतर बसस्थानकवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास व नगरपालिकेसमोरील पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील.त्यानंतर त्यांच्या शुभहस्ते उत्सवमुर्तीस विधीवत जलाभिषेक होईल.दुपारी साडे बारा वाजता शिवजन्मोत्सव सोहळा सौ.श्रेयादेवी घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
या शिवजयंती सोहळ्यात सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन लोकोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.