मुरगूड नागरी सह. पत संस्थेच्यावतीने सभासदांना वाहन वितरण

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वाहने वितरण करण्यात आली. यामध्ये दोन एक्सेस १२५ व एक इलेक्ट्रिक बाईकचा समावेश आहे. संस्था कार्यालयासमोर झालेला हा कार्यक्रम तिलाही इलाही दादासो मुल्लांनी (आकनुर), सुहास मोरे, वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यामान्वरांच्या हस्ते या वाहनांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पीएसआय पांडुरंग कुडवे हे होते. संस्थेचे संस्थापक हाजी धोंडीराम मकानदार, चेअरमन जावेद मकानदार, व्हा. चेअरमन मधुकर कुंभार, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
वाहन कर्ज, गृह करताना घर बांधणी कर्ज सोनेतारण कर्ज सभासद कर्ज अशा प्रकारे गरजवंत सभासदांसाठी संस्थेतून कर्ज वितरण केले जाते त्याचाच भाग आज संस्था सभासद वैभव खराडे, अमीर शिकलगार, रमजान ताशिलदार, यांना या वाहनांचे वितरण करण्यात आले.
संस्था स्थापन होऊन अवघे तीन महिने झाले असून अल्पावधीमध्ये लोकविश्वास पात्र ठरलेली आणि मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केलेली मुरगूड नागरी सहकारी पतसंस्था सभासदांसाठी उद्योग व्यवसायासाठी कर्ज पुरवठा व गरजवंत सभासदांना वाहन वितरण करत आहे.
यावेळी तुकाराम परीट, रसुल मुल्ला, नामदेव शिंदे, हर्षद सुतार, रोहीत चव्हाण, विनोद घुंगरे पाटील आदिंसह संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग व सभासद उपस्थित होते.स्वागत- प्रास्ताविक मॅनेजर अजितकुमार कापसे यांनी, तर आभार अभिजीत मगदूम यांनी मानले.